गारगोटी / प्रतिनिधी
विधानसभाआचारसंहिता काळात जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम आयोजित असुनपरजिल्ह्यांतून होणारी अवैध मद्य वाहतूक, साठवणूक, विक्री, आयात- निर्यात, तसेच बेकायदेशीर विक्री विरोधात कारवाई सुरू आहे. यासाठी कोल्हापूर विभागाकडून विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमा तपासणी नाके. बनवून वाहनांची तपासणी केली जात असूनमतदान प्रक्रियेपूर्वी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्य विक्री बंद राहणार आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ यावर कळविण्याचे आवाहन केले होते या नुसार अनेक तत्कार दाराने या टोल फी क्रंमाकवर कॉल केले पण कोणीही फोन उचलत नाही गेले दोन तास झाले असा प्रकार सुरु आहे. जर फोन उचलतच नाहीत तर टोल फी क्रंमाक द्यायचा कशाला ? हा टोल फी क्रमाक बोगस आहे काय ? असा सवाल तक्रारदार व्यक करत आहेत यांची दखल निवडूक विभागाने घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे
Leave a Reply