
गारगोटी /प्रतिनिधी-
दरवर्षीप्रमाणे भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ येथे श्री दत्तात्रेयांचा ४३ वा गुरूद्वादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रींची भव्य मिरवणूक भव्य वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. सकाळी पहाटे श्री दत्तात्रेयांचा महाभिषेक व प्रसाद वाटप करण्यात आले. यानिमित्त दत्त सेवा मंडळ वेंगरुळ व ग्रामस्थ यांच्यावतीने भव्य चिखली स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच ए.के. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयसिंग देसाई, बाबासो गुरव, मधुकर ऐनापुरे, संजय देसाई, बंडा देसाई, यशवंत मेणे, दिगंबर गुरव, दिग्विजय देसाई, शिवाजी देसाई प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक-दिगंबर गुरव कडगाव, द्वितीय क्रमांक-संदीप तेजम विटे, तृतीय क्रमांक-तडाका तालीम आजरा, चतुर्थ क्रमांक-विठ्ठल पोवार ममदापूर, पाचवा क्रमांक-केतन शिवाजी राणे ममदापूर, सहावा क्रमांक-सुनील मस्कर दाभिल (ता.आजरा), सातवा क्रमांक- सुधाकर मनोळकर आजरा यांना मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांना दत्त सेवा मंडळ वेंगरुळ यांच्याकडून बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्यांना कुलदीप कृष्णा कोटकर यांच्याकडून कायमचे शिल्ड बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेचे घड्याळ पंच म्हणून पांडुरंग देसाई, झेंडा पंच रघुनाथ मेणे यांनी काम पाहिले.पंच म्हणून एकनाथ देसाई, रंजीत कांबळे, अंकुश देसाई, बबन जाधव, कुलदीप कोटकर, धनाजी जाधव, शिवाजी देसाई, अशोक लाड जनार्दन गुरव व दत्त सेवा तरुण मंडळाचे सर्व युवक उपस्थित होते. या स्पर्धेचे समालोचन सुरज कांबळे यांनी केले. यावेळी भुदरगड, आजरा, पन्हाळा व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत बैल जोडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून हजारो चिखली गुठ्ठा शौकीन उपस्थित होते.
Leave a Reply