खानापूर येथे करवीर निवासिनी आंबाबाईचा कुंकुमार्चन सोहळा संपन्न

गारगोटी ता. १३( प्रतिनिधी)

श्रावणमासानिमित्त खानापूर ता. भुदरगड येथे करवीर निवासिनी अंबाबाईचा नामस्मरण व कुंकूमार्चन सोहळा संपन्न झाला.सरस्वती उन्नती महिला मंडळाच्या वतीने भुदरगड तालुक्यात पहिल्यांदाच झालेल्या या सोहळ्यात शेकडो महिलांनी भाग घेतला.यावेळी सौ. विजयालक्ष्मी प्रकाश आबिटकर या प्रमुख उपस्थित होत्या.

सरस्वती उन्नती मंडळाच्या अध्यक्षा सौ.विद्या प्रविणसिंह सावंत संध्या पिंपळगावकर या महिला पुरोहित यांच्याकडून विधिवत १००८ वेळा कुंकू देवी चरणी अर्पण करणे व मंत्र उपचार करण्यात आले. यावेळी ,सौ विद्या प्रविणसिंह सावंत, सौ उज्वला चौगले,सौ.विद्या भांडवले,खानापूर गावच्या सरपंच सौ. शोभाताई गुरव, सौ. शोभाताई मांगले, ग्रामपंचायत सदस्या सौ सुजाता रेडेकर यासह गारगोटी, खानापूर, कलनाकवाडी, आंबवणे परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *