शालेय आंतरवासिता टप्पा – 2 अंतर्गत श्रीराम हायस्कूल, गंगापूर येथे एक राखी सैनिकांसाठी उपक्रम संपन्न

गारगोटी (प्रतिनिधी) –

श्री मौनी विद्यापीठ संचलित, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी येथील बी.एड् प्रशिक्षणार्थींनी शालेय आंतरवासिता टप्पा – 2 अंतर्गत श्रीराम हायस्कूल, गंगापूर येथे ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत ‘सीमेवरील जवानांचे अनुभव’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री दिग्विजय दिलीप पाटील हे सैनिक लाभले. त्यांनी प्रत्यक्ष सीमेवर काम करताना आलेले थरारक रोमांचकारी अनुभव सांगितले. प्रमुख व्याख्याते यांचे मार्फत बी.एड् प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या राखी निर्मिती कार्यशाळेत विद्यार्थिनींनकडून तयार करून घेतलेल्या राख्या सीमेवर लढणाऱ्या सैनिक बंधूंसाठी पाठविण्यात आल्या.

कार्यक्रमासाठी गट मार्गदर्शिका एस. आर. बाड मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री. ,ए. एस. तोरस्कर सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या कांबळे सूत्रसंचालन माया कांबळे तर आभार ऋतुकेश लोकरे यांनी केले.

अशा प्रकारे प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. सावंत सर, छात्रमुख्याध्यापक सौरभ गुरव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, बी.एड् प्रशिक्षणार्थी व सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *