
गारगोटी ता. २ (प्रतिनिधी )
१०० कोटी ठेवी असलेल्या जनता गृहतारण सहकारी संस्था आजरा शाखा गारगोटीच्या चेअरमनपदी प्रा. आनंद मारुती चव्हाण यांची फेरनिवड झाली, यावेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन मारुती मोरे होते.१०० कोटी ठेवी असलेल्या या संस्थेचे हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष असून ही निवड २०२५ ते २०३० यासाठी आहे, व्हाईस चेअरमनपदी प्रा डॉ संजय देसाई यांची फेरनिवड झाली, तर संचालक म्हणून महादेव मोरूस्कर व सत्यजित शिवाजीराव चोरगे यांची निवड करण्यात आली, यावेळी चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार मारुती मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे जनरल मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले यावेळी शाखा व्यवस्थापक दत्तात्रय शिंदे, अरविंद देसाई, ओंकार पाटील आदी उपस्थित होते. शेवटी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार यांनी आभार मानले.फोटो ओळ–चेअरमन आनंद चव्हाण यांचा सत्कार करतांना संस्थापक मारुती मोरे व मान्यवर
Leave a Reply