
गारगोटी प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भुदरगड किल्ल्यावर सहा जून शुक्रवार रोजी शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती युवा नेते पार्थ प्रवीणसिंह सावंत यांनी दिली.
या दिवशी विविध उपक्रमाने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणारा असून संपूर्ण भुदरगड किल्ल्याची स्वच्छता युवक मंडळी करणार आहेत त्याचबरोबर पहाटे मंदिरात अभिषेक तसेच प्रार्थना करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास तालुक्यातील तमाम युवक मंडळी यांनी उपस्थित राहून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करूया असे आव्हान पार्थ प्रवीणसिंह सावंत यांनी केले आहे.


Leave a Reply