
गारगोटी ता.११ (प्रतिनिधी) :
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी खानापूर ता भुदरगड येथील पार्थ प्रविणसिंह सावंत यांची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी एका कार्यक्रमात त्यांना निवडीचे पत्र दिले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी हे निवडीचे पत्र देण्यात आले.. अध्यक्षस्थानी प्रवीणा महिला सबलीकरण फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. प्रमोदिनी माने होत्या. कोल्हापुरातील शाहू स्मारक येथे सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतानाच पत्रकारितेचे बदलते स्वरुप याविषयी विवेचन केले. सहा एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय महाअधिवेशनास डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री फास्के यांनी यावेळी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पत्रकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. जेष्ठ पत्रकार सुनंदा मोरे, श्रद्धा जोगळेकर, शुभांगी तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला आघाडीच्या कोल्हापूर शहराध्यक्षपदी अमृता पवार, उपाध्यक्षपदी सुरेखा शेजाळे तर सचिवपदी शुभांगी तावरे यांची निवड जाहीर करून त्यांना निवडपत्रे प्रदान करण्यात आली.
संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी आभार मानले तर जिल्हा सचिव संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, प्रदेश सचिव तेजस राऊत, जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले, कोल्हापूर शहराध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला, उपाध्यक्ष विजय यशपुत्त, शिरोळ तालुकाध्यक्ष इकबाल इनामदार, हातकणंगले तालुकाध्यक्ष कीर्तीराज जाधव, शाहूवाडी तालुकाध्यक्ष सतीश नांगरे, कागल तालुकाध्यक्ष ओंकार पोतदार, राधानगरी तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख राजा मकोटे, सहसचिव इंद्रजीत मराठे, संतोष नाधवडेकर, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, इचलकरंजी शहराध्यक्ष सॅम संजापुरे, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती कलढोणे आदींसह संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply