
गारगोटी/ प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यातील शेणगांव च्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा मानबंदू ठरलेल्या जोतिर्लिंग नवरात्र उत्सव सोंगी भजन स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून या स्पर्धेमध्ये विठ्ठलपंथी संगित सोंगी भजनी मंडळ दुर्गुळवाडी (ता करविर) यांनी प्रथम क्रमांक पटकवला तर लिंगनूर ता कागल च्या राजा पंढरीचा संगित सोंगी भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत अवधुत चिंतन सोंगी भजनी मंडळ,सोन्याची( शिरोली ता राधनागरी) यांना तिसरा क्रमांक मिळाला. तसेच रामलिंग संगित सोंगी भजनी मंडळ पाळ्याचाहुडा (ता.भुदरगड) व माऊली संगित सोंगी भजनी मंडळ (वाटंगी ता आजरा) यांना चतुर्थ क्रमांक विभागून देण्यात आला. विजेत्यांचे आणि सहभागी सर्व भजनी मंडळांचे ग्रामस्थ, रसिकांनी अभिनंदन केले. नवरात्रीच्या या नऊ रात्री ही संगीत सोंगी भजनी मंडळ स्पर्धा गेले २१ वर्षा पासून अव्याहतपणे सुरू आहे.या पंचक्रोशीतील रसिक, भाविक वर्षभर या सादरीकरणाची वाट पाहत असतात.सामाजिक प्रबोधनाच्या या सोहळ्यातून आनंदाच्या ललकारी बाहेर पडत असतात.अस्सल ग्रामीण कलाकारांच्यातील अलौकिक कला, महिलांना लाजवणारी बहारदार नृत्ये सादर करणारे पुरूष, संगित संच आणि सर्वोत्तम अभिनयाचे सादरीकरणाची, मेकप, लाईट इफेक्ट या सर्व भजनी मंडळानी सा दरीकरण चांगली झाल्याची भावना या स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष माणसिंग तोरसे यांनी व्यक केली. गावातल्या लोकांच्या सहकार्य व दातृत्वावर ही स्पर्धा चालत राबवली जाते. या वर्षी लिंगनूर (ता.कागल) च्या राजा पंढरीचा संगित सोंगी भजनी मंडळाचा जाणता कलाकार गजानन माळी यांनी उत्कृष्ठ अष्टपैलू पुरुष कलाकाराचा किताब मिळविला तर कुडुत्री ता करवीरच्या अष्टविनायक संगित सोंगी भजनी मंडळाचा दत्तात्रय डवर यांनी उत्कृष्ठ अष्टपैलू स्त्री कलाकाराचा मुकुट मिळविला. अंन्य सादरीकरणात उत्कृष्ट गायक माणसिंग कांबळे (रामलिंग पाळ्याचाहुडा),उत्कृष्ट बालकलाकार कु.वृषभ कुणाल ( माऊली नवले ता भुदरगड), उत्कृष्ट संगित संच (विठ्ठलपंथी संगीत सोंगी भजनी मंडळ दुर्गुळवाडी),उत्कृष्ट ढोलकीपट्टू रामदास देसाई (संत तुकाराम आणूर ता कागल), उत्कृष्ट दिग्दर्शन (विठ्ठलपंथी संगित सोंगी भजनी मंडळ दुर्गुळवाडी ता करविर), उत्कृष्ठ नृत्य सुमित टोणपे राजा पंढरीचा (लिंगनूर (कापशी) ता कागल), उत्कृष्ट पाटील आनंदा पाटील (संत ज्ञानेश्वर हडलगे ता गडहिंग्लज),उत्कृष्ठ धनगर संदिप बनारे (विठ्ठलपंथी दुर्गुळवाडी), उत्कृष्ठ भटजी मधुकर जाधव (माऊली वाटंगी )तर उत्कृष्ट विनोदी कलाकाराचा मान प्रकाश राऊत (सोन्याची शिरोली यांना मिळाला). प्रत्येक सहभागी सोंगी भंजनी मंडळास ऱोख रूपये सात हजार व चांदीचे स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ प्रदान करण्यात आले.
Leave a Reply