
गारगोटी ता.५ (प्रतिनिधी) –
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी गारगोटी येथील प्रविणसिंह सावंत यांची निवड करण्यात आली.कोल्हापूर येथे मराठा महासंघाचा चैत्र गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला,या मेळाव्यात ही निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड राजेंद्र कोंढरे यांचे हस्ते यावेळी सावंत यांना देण्यात आले.
यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, शशिकांत पाटील, भुदरगड तालुकाध्यक्ष आनंद चव्हाण,जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा भोसले,गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, पार्थ सावंत, दत्तात्रय चव्हाण, सुरेश पाटील,रमेश माने,संजय चिले, कृष्णा गोरे, वसंत चौगुले, प्रसाद पिलारे, सुरेश फगरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply