
गारगोटी ता. २(प्रतिनिधी )
मराठा कुणबी समाजाचे आरक्षण, शैक्षणिक प्रवेश,विद्यार्थी शिष्यवृत्ती यासह अनेक मागण्या प्रलंबित असून समाजाच्या या मागण्या सोडवण्यासाठी व समाजाच्या कल्याणासाठी शासनाने मंत्रिमंडळ उपसमिती नेमावी व हे समाजाचे सर्व प्रश्न लवकर सोडवावेत, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मारुतीराव मोरे यांनी केली आहे, याबाबतचे निवेदन त्यांनी आज गारगोटी येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी त्यांनी मंत्री महोदयांशी चर्चा केली.निवेदनात म्हटले आहे की,मा सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी (मराठा)आरक्षण अधिनियम २०२४ संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.याबाबत अनेकांनी विरोधी याचिका दाखल केल्या आहेत,ही सुनावणी १८ जुलै २०२५ पासून सुरु झालेली आहे,ही सुनावणी दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी पूर्ण दिवस होणार आहे, मराठा समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपण याला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिलेले आहे,याचिकेबाबत समन्वय ठेवण्यासाठी व याबाबत अडचणी,आढावा, माहिती संकलन आवश्यक आहे. यासाठी मागील सरकारने मंत्री मंडळ उपसमिती नेमली होती,त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात पण ही उपसमिती काम करत होती, पण या सरकारने अद्याप ही समिती नेमली नाही,त्यामुळे या केसकडे कोणाचेच लक्ष नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.सुनावणी दरम्यान सामान्य प्रशासन विभागातील एक अधिकारी उपस्थित राहतात, शैक्षणिक प्रवेश, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती,आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, व्याज परतावा यांत होणारा विलंब,जात प्रमाणपत्र व पडताळणी यांत होणारा विलंब, नॉन क्रिमिलियर दाखले अशा विविध गोष्टीसाठी पाठपुरावा लागतो यासाठी मंत्री मंडळ उपसमिती लवकरात लवकर नेमावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी केली, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत, भुदरगड तालुकाध्यक्ष आनंद चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, मधुकर खवरे, मारुती कुंभार आदी उपस्थित होते.
Leave a Reply