
फोटो ओळ-भुदरगड तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करताना तहसिलदार डॉ अर्चना पाटील,सचिन पाटील, डॉ सुशांत कांबळे, आनंद चव्हाण आदी
गारगोटी ता.७ (प्रतिनिधी) :
भुदरगड तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत आज काढणेत आली, येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज तालुक्यातील सर्व ९७ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.भुदरगडच्या तहसिलदार डॉ अर्चना पाटील यांनी या सरपंच पदाच्या सोडती जाहीर केल्या.भुदरगड तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या सालात निवडणूक होणाऱ्या ९७ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आल्या. पंचायत समितीच्या सभागृहात यावेळी राजकिय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती,यावेळी तहसिलदार डॉ अर्चना पाटील यांचे प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. व चिठ्ठीद्वारे आरक्षण जाहीर केले. विशेष म्हणजे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गारगोटी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण नामाप्र महिला साठी आरक्षित झाले. तर अनेक गावांत गट दोन तीन वेळा सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असतानाही पुन्हा यावेळी सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झालेने नाराजी व्यक्त केली. तर म्हसवे ग्रामपंचायत नामाप्र महिलांसाठी आरक्षित झाले.
महत्वाच्या ग्रामपंचायत व आरक्षणअनुसूचित जाती– सर्वसाधारण- पुष्पनगर,आदमापूर, वेंगरूळ तर महिलांसाठी पांगिरे, पाटगाव, टिक्केवाडी, बारवेनामाप्र गटासाठी – सर्वसाधारण– शेळोली, देऊळवाडी,पिंगळगाव, फणसवाडी, तर महिलांसाठी गारगोटी,दिंडेवाडी, म्हसवेखुल्या गटासाठी- सर्वसाधारण- मुदाळ,नाधवडे, कोनवडे, पाल, कलनाकवाडी, मिणचे खुर्द, लोटेवाडी, बेगवडे, सूत्र महिलांसाठी कडगाव, निळपण,आकुर्डे, वाघापूर, हणबरवाडी,कूर, खानापूर, गंगापूर, शेणगाव,मडीलगे खुर्द या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या.भुदरगड तालुक्यात अनुसूचित जाती साठी सर्वसाधारण ५ तर महिलांसाठी ६ ग्रामपंचायत आरक्षित झाल्या, तर अनुसूचित जमातीसाठी तालुक्यात लोकसंख्या नसल्याने एकही ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षित झाले नाही. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सर्वसाधारण १३ व महिलांसाठी १३ अशा २६ ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षित झाले.तर खुला गटासाठी सर्वसाधारण ३० व महिलांसाठी ३० ग्रामपंचायत सरपंच पद आले. यावेळी कु अनुराधा अमित मिठारी व विराज चंद्रकांत चव्हाण या दोन लहान मुलांनी चिठ्ठ्या काढल्या.
यावेळी निवासी नायब तहसिलदार डॉ सुशांत कांबळे, नायब तहसिलदार सचिन पाटील, आनंद चव्हाण, भाजपा चे प्रविणसिंह सावंत, बिद्री साखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई, गारगोटी सरपंच प्रकाश वास्कर, यांचेसह तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply