
गारगोटी ता. १ (आनंद चव्हाण)
भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवरील पाटगाव धरण भरल्यानंतर आता चिकोत्रा नदीवरील चिकोत्रा धरण ही भरले आहे, या धरणातून आजपासून विसर्ग वाढवण्यात आल्याने नदी काठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.चिकोत्रा नदीवरील चिकोत्रा धरणाचा एकूण पाणी साठा १.५२२ टीएमसी आहे, भुदरगड तालुक्यातील पाच गावे व कागल तालुक्यातील अनेक गावांचा या धरणामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटला आहे, धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात ३३ मिलिमिटर पावसाची नोंद झाली असून १ जुनपासून आजपर्यंत १६३५:मिलिमिटर पाऊस झाला आहे.आजच्या दिवशी धरणाची पाणी पातळी ६८८. ०० मीटर इतकी आहे, तर ४३. ११५ दशलक्ष घनमीटर म्हणजे १५२२.६४ दशलक्ष घनफूट आहे. धरणाची आजची पाणीपातळी ६८७. ७० मीटर इतकी आहे, तर एकूण पाणीसाठा ४२. ३६० दशलक्ष घनमित्टर आहे.आज सकाळी सहा वाजता धरण ९९ टक्के भरले आहे, धरण भरण्याची शक्यता लक्षात घेऊन सांडव्यावरून १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग चालू केला आहे तर विद्युत गृहातून या अगोदरच १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे, त्यामुळे धरणातून चिकोत्रा नदीत एकूण २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढणार आहे, त्यामुळे नदी काठावरील गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.असे वेदगंगा-चिकोत्रा पाटबंधारे उपविभाग गारगोटीचे सहा. उपअभियंता महेश चव्हाण यांनी सांगितले.
Leave a Reply