


गारगोटी प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्यातील जंगल परिसरात वणवे लागण्याचे प्रमाण वाढत असुन वणव्यामुळे जंगलांचे अपरिमीत हानी असुन वन विभाग मात्र मुग गिळून गप्प आहे.वणव्यांना वनविभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरुन त्यांचे निलंबन करावे अशी मागणी पार्थ प्रविणसिंह सावंत यांनी केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र आहे,तर फये,देवकेवाडी,हेदवडे परिसरात पर्यटक युवकांची हुल्लडबाजी सुरू असते त्यातुन जंगलाना वणवे लालण्याचे प्रमाण वाढत चालले आहे,जंगली प्राण्यांच्याबरोबर वनौषधी वृक्षाचे मोठे क्षेत्र आहे पण अज्ञानातुन शेतकरी वणवे लावतात तर काही ठिकाणी अजाणतेपणातुन वणवे लावले जातात. मात्र गेली काही महिने वनविभाग झोपेचे सोंग घेऊन गांधारी ची भुमिका घेत आहे, दिवसाढवळ्या वणवे लावले जात असून वनविभाग नेमकी भुमिका काय करते असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यात डोंगर तसेच जंगलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असुन याला संरक्षीत करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे मात्र वनविभाग रंगपंचमी खेळण्यात मश्गूल असुन केवळ छोट्या मोठ्या कारवाईचा फार्स दाखवला जात असुन वणव्यास कारणीभुत वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पार्थ प्रविणसिंह सावंत यांनी केली आहे.
Leave a Reply