
गारगोटी ता. १(प्रतिनिधी)गंगापूर येथील श्रीराम हायस्कुल येथे आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.येथील आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, येथील बीएड द्वितीय वर्ष सत्र तीन मधील प्रात्यक्षिक शालेय आंतरवासिता टप्पा दोनचा शुभारंभही झाला.. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. आंतरवासितेच्या मार्गदर्शिका प्रा. एस. आर. बाड यांनी शालेय अध्यापन अध्यापनेतर उपक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी. व्ही. सावंत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्र मुख्याध्यापक सौरभ गुरव यांनी केले. छात्रप्रशिक्षणार्थी यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले. तसेच छात्र प्रशिक्षणार्थी माया कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार सारिका पाटील मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी पटकुरे यांनी केले.
Leave a Reply