
गारगोटी ता. २ ( प्रतिनिधि)
समाज व्यवस्थेचे अचूक निरीक्षण करुन त्याला कागदावर प्रकट करुन समाजासमोर वाचा फोडणारे आण्णाभाऊ साठे महान कवी,कथाकार,कादंबरीकार,शाहिर होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आघाडीवर होते त्यामुळे चळवळीचे अग्रणी होते,असे प्रतिपादन जनवादी चळवळीचे सचिव कॉ. अंकुश कदम कणकवली यांनी केले. ते पुरोगामी विचार मंच आयोजित साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे जयंती प्रसंगी शाहू वाचनालय येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण होते. आण्णा भाऊ साठे विचार मंचच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले.प्रतिमा पूजन गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कॉ.संपत देसाई,कॉ.सम्राट मोरे,मश्चिंद्र मुगडे,राजेंद्र यादव शिवाजी जाधव,आदिनाथ मोरे,प्रदीप थडके,विलास वायदंडे,अशोक साठे, सुभाष कांबळे,राजू मोरे,उपस्थित होते.स्वागत सचिन भादिंगरे, प्रास्ताविक कृष्णा भारतीय यांनी केले.तर आभार मानसिंग देसाई यांनी मानले.
Leave a Reply