
गारगोटी प्रतिनिधी :
महिलांना स्वावलंबी केले तर कुटुंब सक्षम बनते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे याव्यात साठी विविध योजना राबवित असुन सरस्वती गारमेंट सेंटर माध्यमातून महिला स्वयंपुर्ण बनवेल असे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. खानापूर -गारगोटी सरस्वती गारमेंट सेंटर चा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर होते.तर सौ अंजली पाटील, प्रविण सिंह सावंत प्रमुख उपस्थित होते. ना.पाटील म्हणाले की, लाडक्या बहिणी योजनेमुळे राज्यात प्रथमताच महिलांच्या खात्यावर पेसै आले पण स्वयंरोजगार मुळे कुटुंबाला आणखीन लाभ होणार आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर म्हणाले की, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कामातुन एक चांगला आदर्श निर्माण केला असुन खूप चांगल्या पद्धतीचे काम त्यांनी केले आहे. सामान्यतल्या सामान्य माणसाबरोबर ज्या पद्धतीने नातं जोडण्याचा तंत्र त्यांनी आत्मसात केलेले आहे.त्यांचा आदर्श आपण घेवूया.
यावेळी सुत्रसंचलन सुशांत मगदुम यांनी केले तर सरपंच शोभा गुरव,पार्थ सावंत,प्रा.सुनिल मांगले,दिनकरराव मगदुम,बी डी भोपळे, विद्याताई सावंत, क्रांती मांगले, दत्तात्रय पाटील, उत्तम पाटील,राजश्री मांगले,उत्तम पाटील, बाजीराव पाटील उपस्थित होते .फोटो ओळी… उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांचा सत्कार करताना प्रविण सिंह सावंत,पार्थ सावंत.



Leave a Reply