
पाल (श्री. रेपे यांजकडून) :
दि. 15/10/2024 रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून “वाचन प्रेरणा दिवस ” व्ही व्ही आय टी पाल या पॉलिटेक्निक संस्थेमध्ये साजरा करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डी. व्ही. रेपे सर यांनी “वाचनाचे फायदे ” याविषयी मार्गदर्शन केले.यनिमित्त विद्यार्थ्यांना वाचन प्रोत्साहणासाठी म्हणून ” शिक्षण संक्रमण ” हे मासिक भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डी. व्ही रेपे सर, अकॅडमिक कोऑर्डीनेटर एस. एस. लोहार सर, संगणक विभाग प्रमुख पी. एम. किल्लेदार सर, ए. ए.बोटे सर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जी. सावंत सर यांनी केले व आभार पी. पी.बेरळेकर यांनी मानले.
Leave a Reply