वाघापूर हायस्कूलमध्ये पर्यावरण पूरक रक्षाबंधनाचा उपक्रम– ‘ए स्टेप टूवर्ड्स प्लांटेशन’ उपक्रम

गारगोटी ता. ६(प्रतिनिधी)

येथील श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी यांच्या शालेय आंतरवासिता टप्पा २ अंतर्गत वाघापूर हायस्कूल, वाघापूर ता. भुदरगड येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘सीडबॉल राखी कार्यशाळा ’ आयोजित करण्यात आली होती.’ए स्टेप टूवर्ड्स प्लांटेशन’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात सीडबॉल (बियांची गोळी) तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.

सणाच्या पारंपरिक स्वरूपाला पर्यावरणपूरक वळण देत साजरा करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सामाजिक भान आणि कृतीशीलता निर्माण करणारा ठरला.या उपक्रमासाठी प्रो. डॉ. आर. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.वाघापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. बी.शिंदे यांनी या उपक्रमास प्रेरणा दिली.या उपक्रमासाठी अक्षय सावंत यांनी नियोजन केले. छात्र-प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक प्रेमजीत कांबळे यांच्यासह पूर्वा कडव, विभा शिंदे, गीतांजली वारके, अक्षय सावंत, सागर खांडेकर, ऋतुजा कोथळे, संतोष जामगोंड, ऋतुजा कांबळे, गौतमी पाटील, अरुण बरकडे, अस्मिता पाटील, मनीषा कदम, ऋतुजा मोहिते, लतिका कांबळे आधी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *