नाधवडे सत्तासंघर्षात विरोधी गटाच्या सौ.आक्काताई पाटील सरपंचपदी

गारगोटी / प्रतिनिधी नाधवडे (ता.भुदरगड ) येथे अनेक राजकीय घडामोडी होत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत सत्ताधारी गटाला धक्का देत विरोधी आघाडीच्या सौ.आक्काताई अर्जूना पाटील यांची सरपंचपदी निवड झाली.निवडीवेळी सत्ताधारी गटातील सदस्य कृष्णात पाटील अनुपस्थित राहिल्याने सत्ताधाऱ्यांनाच सत्ता गमविण्याची नामुष्की ओढविली आहे.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कूर विभागाचे मंडल अधिकारी सुरेश जंगली यांनी काम पाहिले. नाधवडे ग्रामपंचायतीची २०२१ मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी गटाच्या कै.संभाजीराव पाटील यांनी ११ पैकी सहा जागा जिंकत राष्ट्रवादीच्याच शंकरराव पाटील यांची ग्रामपंचायतीवरील दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली होती. तेंव्हा सत्ताधारी गटाकडून सौ.गिता संभाजी पाटील यांना प्रथम अडीच वर्षे सरपंच पदाची संधी देण्यात आली.नंतर आघाडी अजेंठ्यानुसार सौ.शितल धनाजी पाटील यांना सरपंचपदी संधी मिळाली. दरम्यान गेल्या जुलै महिन्यात सत्ताधारी गटातील उपसरपंच विठ्ठल पाटील यांचे आकस्मिक निधन झाले.त्यामुळे ती जागा रिक्त राहिल्याने सत्ताधारी व विरोधक यांच्याकडे पाच-पाच सदस्यांचे समान बलाबल शिल्लक राहिले होते. दरम्यान सत्ताधारी गटाच्या सौ.ऊर्मिला पाटील यांना सरपंचपदाची संधी देण्यासाठी आघाडी अजेंठ्यानुसार पुन्हा सरपंच सौ.शितल पाटील यांनी राजिनामा दिला. पण दोन्हींकडे सदस्य संख्या समान असल्याने अनेक गुप्त राजकीय घडामोडी घडून आल्या.त्यानुसार आज शुक्रवार दि.२५ रोजी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी सत्ताधारी गटाकडून सौ.उर्मिला पाटील यांनी तर विरोधी गटाकडून सौ. आक्काताई पाटील यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. दरम्यान निवडीवेळी सत्ताधारी गटाचे सदस्य कृष्णात पाटील गैरहजर राहिल्याने सौ.उर्मिला पाटील यांना चार तर विरोधी गटाच्या सौ.आक्काताई पाटील यांना पाच मते मिळाल्याने त्यांची सरपंदचपदी निवड घोषित करण्यात आली.जर कृष्णात पाटील हजर राहिले असते तर समान मते नोंद होण्याची शक्यता होती.त्यामुळे चिठ्ठीवरती सरपंच पदाची निवड झाली असती. निवडीनंतर नुतन सरपंच सौ. आक्काताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गुलालाची उधळण करीत व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक श्रीकृष्ण कांबळे,तलाठी विवेक पिचड,उपसरपंच तानाजी पाटील, ग्रा.प.सदस्य सागर कांबळे, सौ.मेघा पाटील, सौ.पुजा पाटील, सौ.अरुणा पाटील, सौ.गिता पाटील, सौ.उर्मिला पाटील,सौ.शितल पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.फोटो- आक्काताई पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *