गुणवंत कर्मचारी हे मौनी विद्यापीठाचे भूषण -आ. सतेज पाटील विद्यापीठात गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार

फोटो ओळ-गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठात गुणवंत कर्मचारी आनंद चव्हाण यांचा गौरव करतांना आ. सतेज पाटील,चेअरमन मधुकर देसाई, राहुल देसाई,अरविंद चौगले, डॉ.पी बी पाटील आदी

गारगोटी ता.२९ (प्रतिनिधी) कोणतीही संस्थेचा नावलौकिक वाढण्यासाठी त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असते.असे गुणवंत कर्मचारीच श्री मौनी विद्यापीठाचे भूषण असल्याचे मत विद्यापीठाचे अध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
आज श्री मौनी विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचारी व विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला,त्याप्रसंगी ते बोलत होते, फुले सदनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी मंडळाचे चेअरमन मधुकर देसाई होते.यावेळी बोलताना आ. सतेज पाटील म्हणाले, श्री मौनी विद्यापीठाची स्थापना अनेकांच्या त्यागातून झाली आहे, विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ही पूर्वी चांगल्या पद्धतीने सेवा केली,आणि म्हणूनच विद्यापीठात नव्याने अनेक उपक्रम राबविता आले.प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ पी बी पाटील यांनी केले,यावेळी आ पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आनंद चव्हाण, सुधीर गुरव या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी चेअरमन मधुकर देसाई,आनंद चव्हाण, सौ पुष्पा सरदेसाई यांची भाषणे झाली, कार्यक्रमास शासन प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, राहुल देसाई, विद्यापीठातील सर्व संस्थांचे सस्थाप्रमुख,मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनया रायजाधव यांनी केले.शेवटी कर्मचारी प्रतिनिधी प्रा डॉ अरविंद चौगले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *