
गारगोटी ता.२९ (प्रतिनिधी)
भुदरगड तालुक्यातील खानापूर येथे तळे माऊली मंदिराच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित लेझीम स्पर्धेत जय बजरंग लेझीम मंडळ तिरवडे ता भुदरगड या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.खानापूर गावचे सुपुत्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने खानापूर येथे तळेमाऊली मंदिराच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धा झाल्या,आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले,तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला. या लेझीम स्पर्धेत दुसरा क्रमांक जय जिजाऊ लेझीम मंडळ धुंदवडे ता गगनबावडा जि कोल्हापूर ,तिसरा क्रमांक राशिंग लेझीम मंडळ राशिंग, ता अथणी, जि बेळगाव तर उत्तेजनार्थ संस्कृती लेझीम मंडळ दारवाड ता भुदरगड जि कोल्हापूर यांनी मिळविला, तर राज्यस्तरीय खुल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक आदिती रणजित शिंदे,रा कोल्हापूर, दुसरा क्रमांक प्रियांका शांताराम गायकवाड रा कपिलेश्वर,ता राधानगरी, तिसरा क्रमांक स्नेहल ददयानंद भांडवले रा.आंबवणे, ता भुदरगड तर उत्तेजनार्थ मानसी अनिल मातीवड यांनी मिळविला, सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह बक्षिस देण्यात आले.लेझीम स्पर्धेचे परीक्षक म्हणून विनायक चौगले, बाबुराव गुंड, दत्तात्रय चव्हाण यांनी तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.आनंद चव्हाण, डॉ विनया रायजाधव, सौ नूतन बिरंबोळे, सौ आर्या पाटील यांनी केले.
स्पर्धेचे उदघाटन गारगोटीचे माजी सरपंच भाई आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते व संयोजक प्रविणसिंह सावंत,पार्थ सावंत, कूर गावचे माजी सरपंच वसंतराव प्रभावळे, सुशांत मगदूम ,प्रा सुनिल मांगले, माजी सरपंच सौ विद्या सावंत, भुजंगराव मगदूम यांच्या उपस्थितीत झाला,तर बक्षिस वितरण समारंभ जिल्हा बँकेचे संचालक प्रा अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते झाला. पाटील यांनी केले,यावेळी सरपंच सुभाष गुरव,कलनाकवाडीचे उपसरपंच अजिंक्य बोडंगे, संजय रेडेकर,माजी सरपंच विजय पवार , सुभाष पाटील , सागर नाईक स्वप्नील मांगले, दत्ता पाटील, सचिन घरपणकर, सुभाष सुतार,दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.फोटो ओळ–खानापूर ता. भुदरगड येथे झालेल्या लेझीम स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देताना जिल्हा बँकेचे संचालक प्रा अर्जुन आबिटकर, प्रविणसिंह सावंत, भाई आनंदराव आबिटकर,पार्थ सावंत आदी
Leave a Reply